कल्ला करून गल्ला भरण्याचा प्रयत्न : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप 

tapowan road
tapowan road
Updated on

नगर : तपोवन रस्त्याबाबत शिवसेनेने कायमच "कल्ला करून गल्ला' भरण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाऊलबुधे, सुनील त्रिंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून तपोवन रस्त्याचे काम मंजूर करून आणले. पहिल्याच पावसात हा रस्ता खचला. त्याची नऊ नगरसेवकांनी तक्रार केली. आमदार जगताप यांनीही पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यावर सरकारने समिती नेमून चौकशी सुरू केली. तपोवन रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई होईलच. रस्त्याच्या कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, शिवसेनेने तपोवन रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी सुरू झाल्यावर नाहक आरडाओरड सुरू केली. शिवसेनेच्या माजी आमदारांनीच हा रस्ता होऊ नये यासाठी अनेकदा आडकाठी आणली. नुसताच कल्ला करून गल्ला भरण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. 

महापौर असतानाही माजी महापौरांना महापालिकेची निवडणूक लढविता आली नाही. महापौर असताना त्यांचा स्वीय सहायक लाचेच्या सापळ्यात अडकला तो कोणामुळे? कोणाचे मोबाईल बिल भरण्यासाठी पैशांची मागणी केली होती, हे जाहीर करावे, असा टोलाही नगरसेवकांनी लगावला.

संपादन - अमित आवारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com