
अहमदनगर : 'पोलिसाचा गणवेश मिळाला, ही अभिमानाची बाब आहे. गोरगरीब, शोषितांची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे. आगामी काळात बॉर्डरलेस क्राईम, तसेच आर्थिक गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालावा लागेल,' असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले.
अनुकंपा तत्त्वावरील, तसेच कोरोना काळात ज्या पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना नियुक्तिपत्र देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्याम धुमे उपस्थित होते.
दिघावकर म्हणाले, आपल्याला पोलिस युनिफॉर्म मिळाला तो देशाची सेवा करण्यासाठी. स्वतःचा विचार न करता आपल्या मातृभूमीचा विचार केला पाहिजे.'
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, सरकारच्या आदेशानंतर अनुकंपा तत्त्वावरील जागा भरण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर केला. पोलिस महानिरीक्षक दिघावकर यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे ज्यांनी जिवाची पर्वा न करता पोलिस दलात सेवा दिली, त्यांच्या वारसांना सेवेत घेता आले.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.