
सोनई : हनुमानवाडी (ता.नेवासे) येथील नव्वद वर्षांच्या आसराबाई एकनाथ कुटे डोक्यावर तुळस घेऊन पंढरपूरच्या वारीला पायी निघाल्या आहेत. आषाढी वारी करण्याचे त्यांचे यंदा तिसावे वर्ष असून, प्रस्थान झालेल्या शनिशिंगणापूर येथील शनैश्वर दिंडी सोहळ्यात त्यांचा सहभाग सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरला.