
करंजी : करंजी (ता. पाथर्डी) येथील करंजी कृषी मंडलांतर्गत फळबाग मोठ्या प्रमाणात लागवड झालेली असली तरी फळ पिकाचा विमा उतरवताना सुमारे चारशे शेतकऱ्यांनी फळबागा नसतानाच विमा उतरवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तसा अहवाल सादर करण्यात आला आहे.