बैठकीत ठरलं अन्‌ राष्ट्रवादीत गेलेले पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

मातोश्रीवर उद्धव ठाकरे, आमदार नीलेश लंके, मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाच नगरसेवकांची बैठक बुधवारी (ता. 8) दुपारी झाली. या बैठकीत या पाचही नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत यावे, असे ठरले. 

पारनेर (अहमदनगर) : मातोश्रीवर उद्धव ठाकरे, आमदार नीलेश लंके, मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाच नगरसेवकांची बैठक बुधवारी (ता. 8) दुपारी झाली. या बैठकीत या पाचही नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत यावे, असे ठरले. 
शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी नुकताच बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आमदार नितेश लंके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यावरून पारनेर तालुक्‍यातील नव्हे तर राज्यातील राजकारण तापले होते. राज्यात या पक्षाची आघाडी असतानाही अशी फोडाफोडी करणे योग्य नाही. यातून यापूर्वी दोन्हीही पक्ष श्रेष्ठींनी सारवासारव केली होती. मात्र आज झालेल्या बैठकीत या नगरसेवकानी पुन्हा शिवसेनेत जाण्याचे ठरवले आहे. मातोश्रीवरील बैठकीपूर्वी मंत्रालयात अजितदादा पवार, मिलिंद नार्वेकर, आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पाच नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीस तालुका महिला आघाडी प्रमुख उमा बोरुडे, स्वीकृत नगरसेवक विजय वाघमारे, विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, जितेश सरडे यांचीही उपस्थिती. नार्वेकर, आमदार लंके व नगरसेवक यांची सुमारे तासभर चर्चा झाली. आघाडी सरकारवर परिणाम नको म्हणून पुन्हा शिवसेनेत परतन्यावर सर्वांचे एकमत करण्यासाठी आमदार लंके यांनी यशस्वी मध्यस्ती करत पाचही नगरसेवकांना पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत पाठीमागे परतणार आहेत. मिलिंद नार्वेकर, आमदार नीलेश लंके यांनी नाराज नगरसेवकांशी पुढील काळात समन्वय ठेवणार असून पुन्हा त्यांच्यात नाराजी होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल असेही ठरल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was decided in the meeting that five corporators who had joined the NCP would rejoin the Shivsena