
-समीरण बा. नागवडे
श्रीगोंदे : सहकारी कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणी व बदललेली राजकीय परिस्थिती पाहता, एकत्र येणे व सत्ताधारी पक्षात प्रवेश करणे, ही माजी आमदार राहुल जगताप व नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे या दोन्ही नेत्यांची राजकीय अपरिहार्यता होती. या नेत्यांच्या एकत्र येण्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये ''कही खुशी, कही गम,'' असेच चित्र आहे.