कोण आला रे, कोण आला... म्हणत ‘या’ भागात राम राम ऐवजी आता जय महाराष्ट्र

विनायक दरंदले
Wednesday, 12 August 2020

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर शिवसेनेचे शिवबंधन बांधलं आणि सोनई परिसरातील सोशल मीडिया भगवामय झाला.

सोनई (अहमदनगर) : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर शिवसेनेचे शिवबंधन बांधलं आणि सोनई परिसरातील सोशल मीडिया भगवामय झाला. कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला.. ची धून येथे धुमधडाक्यात वाजू लागली आहे.

मंगळवारी गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. काही वेळातच ही बातमी संपुर्ण नेवासे तालुक्यात झाली. या प्रवेक्षानंतर लगेचच कार्यकर्त्यांचे मोबाईलवरील डीपी भगवेमय झाले. हॅलो ट्यून आणि रिंगटोनवर 'कोण आला रे.. कोण आला..'चा धमाका सुरु झाला आहे. व्हॉट्‌सअप, फेसबुक, इन्स्ट्राग्रॅम, ट्टिवटरसह स्टेटस व फेसबुक स्टोरीवर गडाखांचाच बोलबोला सुरु आहे.

तालुक्यातील बेलपिंपळगाव, सलबतपुर, चांदे, माका, वडाळाबहिरोबा, करजगावसह अनेक गावातील कार्यकर्ते व जुन्या शिवसैनिकांशी संपर्क साधला. सर्वांनी या प्रवेशाचे स्वागत केले आहे. युवानेते उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्टाईलमध्येच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू, असे युवा कार्यकर्ते अभिषेक बारहाते यांनी सांगितले. परिसरात आता राम राम ऐवजी जय महाराष्ट्र म्हणून एकमेकांशी संवाद होवू लागला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jai Maharashtra in Newase taluka due to entry of Minister Shankarrao Gadakh in Shivsena