esakal | अनेक वर्षानंतर प्रथमच भरला हंगे तलाव; आमदारांनी केले जलपुजन
sakal

बोलून बातमी शोधा

Jalpujan at the hands of MLA Nilesh Lanka of Hange Lake in Parner taluka

बऱ्याच वर्षानंतर प्रथमच हंगे तलाव भरल्याने पारनेर, हंगे व लोणी हवेली या गावांचा पिण्याचा पाण्याची समस्या मिटली आहे.

अनेक वर्षानंतर प्रथमच भरला हंगे तलाव; आमदारांनी केले जलपुजन

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : बऱ्याच वर्षानंतर प्रथमच हंगे तलाव भरल्याने पारनेर, हंगे व लोणी हवेली या गावांचा पिण्याचा पाण्याची समस्या मिटली आहे. तसेच या परीसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने  अतीशय महत्वाचा असा हंगे तलाव भरल्याने परीसरातील शेतकरीही समाधाणी झाले आहेत. या तलावाचे जलपुजन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले.

हंगे आणि पंचक्रोशाच्या दृष्टीने अतीशय महत्वाचा असा हा तलाव आहे.यंदा झालेल्या समाधानकारक पाऊसाने तो तुडुंब भरला आहे. त्याचे जलपूजन आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रामदास साठे, राजेंद्र शिंदे, अशोक घुले, चंद्रकांत मोढवे, पारनेरचे नगरसेवक डॉ. मुद्दसीर  सय्यद, दिनेश औटी, किसन गंधाडे, साहेबराव देशमाने, नंदकुमार देशमुख, संदीप शिंदे, विजय औटी, राजू खोसे, उमा बोरुडे, वैजंता मते, सुनिता बोरूडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थीत होते.

गेले अनेक वर्षात हा तलाव अतीशय कमी वेळा भरला आहे. दोन वर्षापुर्वी जैन सोशल फाउंडेशनच्या वतीने तलावातील गाळ काढण्यात आला होता.  त्या मुळे  तलावाचा पाणीसाठा  वाढला आहे. पारनेर शहराला तसेच हंगे व लोणी हवेली गावाला या तलावातून पाणी पुरवठा केला जातो.

असा आहे तलाव
तलावाचे काम 1972 मध्ये सुरू झाले व 1978 मध्ये संपले होते. असून पाणलोट क्षेत्र-  76.50 चौरस किलोमीटर, असून  साठवण  क्षमता 66.67 दशलक्ष घनफूट आहे. उपयुक्त पाणीसाठा 47.48 दशलक्ष घनफूट व मृतसाठा 17.19 इतका आहे. धरणाची उंची 15.81 मीटर आहे.तर  लांबी 390 मीटर आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image