
जामखेड : चौंडीत उभे राहणार ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय
जामखेड : नव्या पिढीला इतिहासाची माहिती व्हावी व ही प्रेरणास्थळे ऊर्जितावस्थेत यावीत, याकरिता आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी (चौंडी, ता. जामखेड) वस्तुसंग्रहालय उभारण्यासाठी शासनाकडून मंजुरी घेतली आहे. सीना नदीच्या घाटाचे काम व सुशोभीकरणाबरोबरच नव्याने कमान उभारणीसाठी तब्बल सात कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. कर्जत-जामखेडमधील उर्वरित तीर्थक्षेत्रांसाठीही भरीव आर्थिक निधी मंजूर करून घेतला आहे. दोन्ही तालुक्यांतील प्रेरणास्थळे व तीर्थस्थळे पुनरुज्जीवित होतील.
जामखेड तालुक्यात खर्डा येथे श्री संत सीतारामबाबा व श्री संत गितेबाबा या तीर्थक्षेत्रांचा, तर खर्डा येथील मराठ्यांच्या अखेरच्या विजयी लढाईचा साक्षीदार असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या संवर्धन आणि जतनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. तेथे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळाचाही पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, याकरिता आमदार रोहित पवार यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
चौंडीतील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासमोर विकास आराखड्यासंदर्भात सादरीकरण करून भरीव निधीची मागणी केली होती. त्या मागणीला अखेर शासनाने ''हिरवा कंदील'' दिला. एका परिपत्रकान्वये सदरची रक्कम मंजूर केल्याचे पवार यांनी सांगितले.
निधीची तरतूद शासन स्तरावरून करावी, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी शासनाकडे केली. त्या मागणीलाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा कंदील दिला आणि चौंडी येथे होणाऱ्या दरवर्षीच्या जयंती उत्सव कार्यक्रमाला शासनाकडून आर्थिक निधी देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी येथे होणाऱ्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला शासनस्तरावरून निधी दिला जाणार, हा ऐतिहासिक निर्णय आहे.
घाट बांधणीसाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्षात घाटाचे कामही सुरू झाले आहे. त्यातच नव्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळ विविध विकास कामांसाठी शासनाकडून सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या जन्मस्थळाचे रूप आणखी बदलणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील कामे
खंडोबा मंदिर, देवदैठण- घाट बांधकाम व सुशोभीकरण 35 लाख. नंदादेवी मंदिर, नान्नज - सभामंडप बांधकाम - 25 लाख.
कर्जत तालुक्यातील
कोरेश्वर मंदिर, कोरेगाव - दगडी सभामंडप बांधकाम - 25 लाख (4.) जगदंबा देवी मंदिर, राशीन - सुशोभीकरण व विद्युतीकरण - 30 लाख (5) लालगीर स्वामी मंदिर, मांदळी - सभामंडप व स्वयंपाक खोली बांधकाम - 50 लाख रुपये.
2515 अंतर्गत कामांसाठी 10 कोटी रुपये मंजूर.
Web Title: Jamkhed Historical Museum Set Up Choundi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..