Jamkhed News : बसस्थानक नवीन वर्षात होणार का?, प्रवाशांचा सवाल; बांधकाम ९० टक्के पूर्ण
लवकरच उन्हाळा सुरू होणार असून, यावर्षी ही प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. नूतनीकरणामुळे दोन फलाट सोडता पूर्ण बसस्थानक पाडले आहे.
जामखेड शहर : सरत्या वर्षात जामखेड बसस्थानकाचे काम पूर्ण झाले नाही. या वर्षात तरी जामखेडचे अत्याधुनिक बसस्थानक पूर्ण होईल का? असा प्रश्न नागरिक, विद्यार्थी व व्यावसायिक प्रवासी करत आहेत.