
अहिल्यानगर : जामखेड येथील साकत फाटा येथे एका महिलेच्या घरात दरोडा टाकून शस्त्राचा धाक दाखवून घरातील रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेणारी सराईत दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. आरोपींकडून सुमारे साडेसतरा लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.