
अहिल्यानगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील जामखेड, श्रीगोंदे, कर्जत तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. नगर शहरातही निदर्शने करून या घटनेचा निषेध करण्यात आला. सर्व आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या.