
जामखेड (नगर) : जामखेडचे पोपट हळपावत त्यांचे वय ७७ आहे. हळपावत हे अभ्यासक, मार्गदर्शक तसेच त्यांचा शिवकालीन नाण्यांवर विशेष अभ्यास आहे. यांचा गणपती संग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. जामखेडमध्ये स्थाईक असलेले पोपट हळपावत यांना लहानपणापासून विविध वस्तू जमवण्याचा छंद. या ऐतिहासिक वस्तू जमवता - जमवता त्यात त्यांना वैविध्यपूर्ण गणेश मुर्तीही आढळून आल्या. या सर्वांना एकत्र करून सुसज्य असे संग्रहालय हळपावत यांच्याकडे तयार झाले आहे. काही वस्तू स्वतःच्या जमापुंजीमधून घ्याव्या लागल्या तरीही हळपावत यांनी आपला छंद सोडला नाही.
हळपावत यांच्या गणेश दालनात सर्वात लहान गणपती १.५ से.मी.चा आहे. हा नागबंद गणेश असून नागाचा विळखा गणेशाचा पोटाला आहे. तर सर्वात मोठा गणपती हा २३ से.मी.आहे. हा दशभुजा गणेश उभा आहे, याची सोंड डावीकडे असून सुबक मूर्ती साकारण्यात आली आहे. शहाळ्यावर कोरलेला गणपती या संग्रहाचे आणखी एक आकर्षण आहे. यात कोठेही जोड देण्याचे काम झाले नाही.
काचेचा गणपती, लाकडी गणपती, स्वयंभू गणेश, तांत्रिक गणेश, सातवाहन कालीन दगडी गणेश, कसोटीच्या दगडात कोरलेला गणेश, कौलारूत कोरलेला 100 वर्षापूर्वीचा टेराकोटा गणेश, सनई वाजवणारा, ढोल वाजवणारा गणपती, निद्रास्त गणपती, मक्याच्या कनसामध्ये कोरलेला गणपती, सहा सोंडेचा, अष्टभुजांचा गणपती, सुपारीमध्ये कोरलेला गणपती सगळ्याचे आकर्षण ठरतो.
यात कोणताच गणपती एकसारखा नाही. ५० पेक्षा अधिक गणपतीचा संग्रह हळपावत यांच्या संग्रहात आहे. नुकताच २०१८ मध्ये हळपावत कुटुंबीयांनी आपला अनमोल संग्रह सर्वांना पाहता यावा, या उद्देशाने कोणताही मोबदला न घेता अहमदनरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास भेट दिला. मा. जिल्हाधिकारी राहुलजी द्विवेदी (भा.प्र.से.) डॉ. रवींद्र साताळकर (कार्यकारी विश्वस्त ) यांनी तो स्वीकारून अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात पोपटलाल संजय हळपावत या नावाने दोन दालने आणि एक नाणी संग्रह सुरु केला आहे. हळपावत यांचा संग्रह सर्व पर्यटक, अभ्यासक यांना पाहण्यासाठी खुला केलेला आहे. अशा या दानशूर व्यक़्तिमत्वामुळेच अहमदनगरच्या वस्तू संग्रहालयाचे नावलौकिक साऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.