

Jamkhed residents and traders observe a shutdown to protest the city's severe water shortage.
esakal
जामखेड : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर जामखेडकरांचा संताप रस्त्यावर उतरला. याप्रश्री राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी (ता. १५) पुकारण्यात आलेल्या जामखेड बंदला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून नागरिकांनी पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. भाजपच्या वतीने बंद पाळू नये, असे आवाहन करण्यात आले होते. यामुळे भाजप समर्थक व्यावसायिकांनी आपापली दुकाने उघडी ठेवली होती. मात्र एक वाजेपर्यंत जवळपास कडकडीत बंद पाळण्यात आला. नंतर काही दुकाने उघडली.