
कोपरगाव : विविध शासकीय कार्यालयातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी ‘जनता दरबार’ व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तत्काळ संबंधित अधिकाऱ्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवरच जाब विचारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहे.
त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात आपले प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढती असल्याचे चित्र आज तहसील कार्यालयात दिसून आले.