
अहिल्यानगर : शेवगाव-पाथर्डी येथील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयावर जनशक्ती श्रमिक संघातर्फे संस्थापक ॲड. शिवाजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.१७) अन्याय मुक्ती आंदोलन करण्यात आले. कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्याचे काम कामगार आयुक्त यांनी करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून कार्यालयाचे काम बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.