अहमदनगर : जवखेडे खालसा खटल्यातून तीनही आरोपी निर्दोष

 javkheda triple murder of dalit family in pathardi three accuse acquitted due to lack of evidence
javkheda triple murder of dalit family in pathardi three accuse acquitted due to lack of evidence

अहमदनगर : राज्यात गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात तीनही आरोपींची सबळ पुराव्याअभीवी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अहमदनगर येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीशांनी आज या प्रकरणाचा निकाल जाहीर केला.

20 ऑक्टोबर 2014 ला झालेल्या या हत्याकांडात संजय जाधव त्यांची पत्नी जयश्री व मुलगा सुनील जाधव यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे विहीर व बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलि‍सांना मृतदेह काढण्यास दोन दिवस लागले होते.

जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील संजय (वय ४५), जयश्री (वय ४०), सुनील जाधव (वय १९) या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. या प्रकरणात अहमदनगर प्रधान जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी या तिहेरी हत्याकांडातून प्रशांत उर्फ काळू दिलीप जाधव (वय २९), अशोक दिलीप जाधव (वय ३२) आणि दिलीप जगन्नाथ जाधव (वय ६२, सर्व रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) यांची सबळ पुराव्या अभावी मुक्तता केली आहे.

प्रधान जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी मंगळवारी (ता.३१) सायंकाळी साडे पाच वाजता निकाल जाहीर केला. सरकारी पक्ष आरोपींविरूद्ध आरोप सिध्द करू शकला नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची मुक्तता करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

 javkheda triple murder of dalit family in pathardi three accuse acquitted due to lack of evidence
देशात शिक्षण उद्योग झालाय; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

नेमकं काय झालं होतं?

जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) गावात ता. २० ऑक्टोबर २०१४ रोजी जाधववस्ती येथील गवंडी काम करणारे संजय, त्यांची पत्नी जयश्री आणि एकुलता एक मुलगा सुनील या तिघांची ता. २० ऑक्टोबर २०१४ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्याकांड झालेली वस्तीही एकांती वस्ती असल्यामुळे जवळपास घरे नाहीत. त्यामुळे या हत्या करत असताना शेजारी राहणाऱ्यांना कोणतीही आवाज गेला नाही.

मारेकऱ्यांना पुरावे नष्ट करण्यासाठी पूर्ण रात्रभर वेळ असल्याने त्यांनी सर्व पुरावे नियोजनबद्ध पद्धतीने नष्ट केले होते. घराच्या ओट्यावर हे हत्याकांड झाले होते. हत्याकांडानंतर ज्या ठिकाणी रक्त सांडले होते. तेथे शेजारील शेत जमिनीतून माती आणून टाकली होती. मयताचे कपडे घटनास्थळापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर एका ओढ्याच्याकडेला जाळून नष्ट केले होते. मयत संजयची दुचाकी काही अंतरावर उभी केली होती. त्यामुळे शेजारील लोकांना संजय जाधवचे कुटुंब बाहेर गावी गेले आहेत, अशी परिस्थिती भासवली होती.

 javkheda triple murder of dalit family in pathardi three accuse acquitted due to lack of evidence
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आणखी एका पंजाबी गायकाने मागितली सुरक्षा

प्रशांत उर्फ काळू दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून ता. २२ रोजी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव- पाटील यांनी काम पाहिले. आरोपींतर्फे विधिज्ञ सुनील मगरे, छगन गवई, नितीन मोने, सिध्दार्थ उबाळे, अरूण चांदणे यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com