esakal | बातमी जायकवाडीची ः नगर, नाशिकमधील पावसामुळे धरण एवढं भरलंय
sakal

बोलून बातमी शोधा

Jayakwadi filled fifty per cent

यंदा तालुक्‍यात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने कमी प्रमाणात आवक होत होती.

बातमी जायकवाडीची ः नगर, नाशिकमधील पावसामुळे धरण एवढं भरलंय

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा चांगला झाला आहे. पावसाळ्याचे उर्वरित दिवस लक्षात घेता, यंदा धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने परिसरातील शेती, तसेच शेवगाव-पाथर्डीसह तालुक्‍यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जायकवाडीच्या पाण्यावर तालुक्‍याच्या उत्तर भागातील शेतीसह शेवगाव-पाथर्डी व 56 गावे, शहर टाकळी व हातगाव पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडीतील साठ्यावर मराठवाड्यासह शेवगाव, पाथर्डी व नेवासे तालुक्‍याचे लक्ष लागून असते.

हेही वाचा - नेवासा फाटा झाला इतक्या दिवस लॉकडाउन

यंदा तालुक्‍यात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने कमी प्रमाणात आवक होत होती.

मुळा, भंडारदरा, निळवंडे, गंगापूर, दारणा यांच्यासह अनेक मोठे प्रकल्प अजूनही भरलेले नाहीत. सध्या 3960 क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीपातळी 461 मीटर असून, एकूण पाणीसाठा 1961.844 दशलक्ष घनमीटर आहे.

सध्या धरणात 56.36 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीपासून धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने तालुक्‍यातील फुगवटा भागातील गावात समाधान व्यक्त होत आहे. 

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाण्याची आवक सुरू झाली आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण शंभर टक्के भरण्याची शक्‍यता आहे. पाणीपातळीत झालेली वाढ समाधानकारक आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे. 
- राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी धरण, पैठण 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top