
अहिल्यानगर : विधानसभा निवडणूक प्रचारात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे. शेतमालाला योग्य हमीभाव तातडीने मिळाला पाहिजे, विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळलेल्या व त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करीत जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी दिला.