
अहिल्यानगर : शाळेतील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा शिक्षक आनंदी असेल, तरच तो आनंददायी शिक्षण देऊ शकेल. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.