

राहुरी : राहुरीत दीड महिन्यापूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला राहुरी पोलिसांनी पकडले. त्यात एक पुरुष व एक महिला आरोपीचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून चोरलेले एक लाख पाच हजारांचे सोन्याचे दोन मंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत केले. दोन्ही आरोपींना सोमवारी राहुरी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.