Kakadwadi Robbery : देवीच्या मुकुटांसह दागिन्यांची चोरी: २५ लाख रुपयांचा ऐवज लंपास ; काकडवाडी येथील घटना

Ahilyanagar News : देवीचे दोन चांदीचे मुकूट आणि ५१ तोळे वजनाचे मुकुटावरील सोन्याचे पान, असा तब्बल २४ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
Robbers in Kakadwadi steal 25 lakhs worth of gold jewelry, including valuable goddess crowns. Police are investigating the crime."
Robbers in Kakadwadi steal 25 lakhs worth of gold jewelry, including valuable goddess crowns. Police are investigating the crime."Sakal
Updated on

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा मुख्य दरवाजाचा व गाभाऱ्याचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून अज्ञात चोरांनी धाडसी चोरी केली. देवीचे दोन चांदीचे मुकूट आणि ५१ तोळे वजनाचे मुकुटावरील सोन्याचे पान, असा तब्बल २४ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com