
संगमनेर: घारगाव परिसरात सध्या पावसाळ्याचे आगमन झाल्यामुळे निसर्गाने नवसंजीवनी घेतली आहे. घारगाव परिसरातील कळमजाई देवी धबधब्याला भेट दिल्यानंतर निसर्गाचा नजारा दिसून येत आहे. चारही बाजूंनी घनदाट डोंगरांनी वेढलेला आणि विविध पशुपक्ष्यांनी गजबजलेला हा परिसर म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच! या रमणीय परिसरात पावसाच्या आगमनानंतर कळमजाई देवीचा धबधबा वाहू लागला आहे. कोसळणाऱ्या जलप्रपाताच्या गडगडाटात आणि पक्ष्यांच्या सुरेल किलबिलाटात पर्यटक रमून जात आहेत.