
करंजी : करंजी (ता. पाथर्डी) येथील घाट परिसरालगत असलेल्या वन विभागाच्या जंगलाला मंगळवारी रात्री आठ वाजता आग लागली. या आगीत सुमारे २० हेक्टरपेक्षा जास्त जंगल जळून खाक झाले. या घटनेनंतर वन कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर करंजी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.