आमदारकी गेल्यापासून कर्डिलेंचे मानसिक संतुलन गेलंय, राष्ट्रवादीच्या बेरड यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

कर्डिलेंनी स्वतःच्या मुलाला राजकारणात आणण्यासाठी पुतण्यांना राजकारणात येऊ दिले नाही. जो कुटुंबाचा वाली झाला नाही, तो कार्यकर्त्यांचा काय होणार, या भावनेने कार्यकर्तेही दूर जात आहेत.

नगर तालुका ः आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव बेरड यांनी केली.

पत्रकात बेरड यांनी म्हटले आहे, की शिवसेना व राष्ट्रवादीने कर्डिले यांना राहुरी मतदारसंघात चारी मुंड्या चित केले. आजवर शिवसेना साथ देत होती, म्हणूनच तुम्ही आमदार होत होतात.

कर्डिलेंनी स्वतःच्या मुलाला राजकारणात आणण्यासाठी पुतण्यांना राजकारणात येऊ दिले नाही. जो कुटुंबाचा वाली झाला नाही, तो कार्यकर्त्यांचा काय होणार, या भावनेने कार्यकर्तेही दूर जात आहेत.

नगर तालुक्‍यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाआघाडीनेच तुम्हाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत धूळ चारली, हे विसरू नका. आमदारकी गेल्यापासून ते स्वतःच कार्यकर्त्यांना बोलावून घेतात. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोठमोठी विधाने करतात.

आघाडी सरकार भक्कम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी स्व-अस्तित्वाची चिंता करावी, असे बेरड यांनी पत्रकात म्हटले आहे. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत व गोविंद मोकाटे यांच्या पत्रकावर सह्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kardile has lost his mental balance since he became an MLA