Rohit Pawar vs Ram Shindeesakal
अहिल्यानगर
Karjat Jamkhed Assembly Election : दिग्गज बंडखोरांचा ‘यू-टर्न’! कर्जत- जामखेडमध्ये होणार पारंपरिक लढत
कर्जत- जामखेड मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाल्यापासून जिल्ह्यासह राज्यातील अनेक राजकीय धुरिणांचे लक्ष मतदारसंघाकडे लागले होते.
कर्जत - राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घटनांमुळे जिल्हा बँकेचे संचालक भाजप नेते अंबादास पिसाळ आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रोहित पवार आणि भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम शिंदे या पारंपरिक स्पर्धकांमध्ये सरळ लढत होणार हे निश्चित झाले आहे.

