
कर्जत : ग्रामपंचायतीच्या कामात मुलाने ठेकेदारी केल्याने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविले. घुमरी (ता. कर्जत) ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता संजय अनभुले आणि ग्रामपंचायत सदस्या मंदाबाई अनभुले यांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अपात्र ठरविले आहे.