esakal | भीमा नदीत तस्करांच्या बोटी फोडल्या, कर्जत पोलिसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

बोटी फोडल्या

भीमा नदीत तस्करांच्या बोटी फोडल्या, कर्जत पोलिसांची कारवाई

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्‍यातील गणेशवाडी शिवारातील भीमा नदीपात्रात पोलिसांनी अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. यात 24 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर दोघांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

(Karjat police take action against sand thieves in Bhima river)

याबाबत अधिक माहिती अशी ः पोलिस निरीक्षक यादव यांना गणेशवाडी (ता. कर्जत) येथे भीमा नदीपात्रात काही व्यक्ती यांत्रिक बोटीच्या साह्याने अवैध वाळूउपसा करीत असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिरसाठ यांच्यासह पथकाने तेथे कारवाई केली. यावेळी पंधरा लाख रुपये किमतीच्या तीन यांत्रिक फायबर बोटी व नऊ लाख रुपये किमतीच्या तीन सक्‍शन बोटी, असा एकूण चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. लहू बबलू शेख (रा. पिअरपूर, झारखंड), शौकत बच्चू शेख (रा. पळसगच्ची, झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी भरत बलभीम अमनर, शरद शेंडगे (दोघे रा. वाटलूज, ता. दौंड, जि पुणे), दत्तात्रय विक्रम खताळ, अंकुश ठोंबरे (दोघे रा. गणेशवाडी, ता. कर्जत) यांची नावे सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लहू शेख व शौकत शेख यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.(Karjat police take action against sand thieves in Bhima river)