
कर्जत : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना तत्काळ फाशी द्यावी, तसेच या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून त्वरित अटक करावी, या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्य समन्वयक रावसाहेब धांडे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले, तसेच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव आणि निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांना निवेदन देण्यात आले.