
राशीन : वीटभट्टीवरील मजुराच्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. तिचा गर्भपात झाल्याने तिच्या नातेवाईकांनी बदनामीच्या भीतीने हे अर्भक कपड्यात गुंडाळून फेकून दिले. ही घटना डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून उघडकीस आली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.