esakal | कर्जत तालुक्यात धरणी मातेने पांघरला हिरवा शालू
sakal

बोलून बातमी शोधा

Karjat taluka has good rains this year and nature has turned green

दुष्काळी स्थितीनंतर यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे धरणी मातेने हिरवा शालू पांघरला आहे.

कर्जत तालुक्यात धरणी मातेने पांघरला हिरवा शालू

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : दुष्काळी स्थितीनंतर यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे धरणी मातेने हिरवा शालू पांघरला आहे. यातूनच पौष्टिक अशा पाथरी, कडवंची, तांदुळचा, चिगुळ, अंबाडा, कुंजीर अशा एक ना अनेक रानभाज्या तब्बल दोन वर्षांनंतर फुलल्या आहेत. 

अगदी सहज व फुकट मिळणाऱ्या या रानभाज्यातून हजारो रुपये खर्च करूनही न मिळणारी प्रथिने, व्हिटामिन यातून सहज मिळत आहेत. निरोगी व उत्तम शरीर ठेवण्यासाठी या भाज्या खूप लाभदायक ठरत आहेत. त्यामुळे कोरोना च्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेकजन या रानभाज्यांचा आस्वाद घेत आहेत.

महिनाभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने रानोमाळ अगदी हिरवळ दाटली आहे. त्यामुळे शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर, माळरानावर, ओढ्याच्या, नदीच्या, काठावर असंख्य अश्या रानभाज्या फुलल्या आहेत. या भाज्यांवर कसलेही केमिकल फवारणी अथवा त्याचे रोपण केलेले नसते. केवळ सेंद्रिय व नैसर्गिक वातावरणात या भाज्या फुलल्याने त्या शंभर टक्के निरोगी असतात.

फक्त निसर्गाच्या भरवशावर वाढलेल्या रानभाज्या जेवनातील पौष्टिकता अगदी सहज वाढवतात. या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात खनिज, प्रथिने, व्हिटामीन असतात. दैनंदिन भाजीपाला वर्षभर मिळतोच परंतु बहुतांशी रानभाज्या या फक्त पावसाळ्यात मिळतात. त्यामुळे अनेकजन या रानभाज्यांना पसंती देत आहेत. शेकर्याबरोबरज काही शहरीबाबूंनाही रानभाज्यांची नवलाई असल्याने आसपासच्या खेडेगावातील भाजी विक्रेत्यांकडे रानभाज्यांची मागणी करताना दिसत आहेत.

यामधून सदर विक्रेत्याना आर्थिक आधार तर मिळतोच शिवाय या रानभाज्या खाल्ल्याने शरीरात अग्नी निर्माण करणे, वात, पित्त, कफ दोषशामक, याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासारखे अनेक फायदे यातून सहज मिळतात. अशा या निसर्गाच्या अनमोल ठेव्याची चव चाखून शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेकजन रानभाज्यांना पसंती देत आहेत.

पावसाळ्यात दलदल असल्याने शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे असते. इतर आहारापेक्षा रानभाज्यात याचे प्रमाण जास्त असते. निरोगी राहण्यासाठी दिवसातील किमान एक वेळा आहारात रान भाजीचा समावेश असावा.
- डॉ. संदीप पुंड, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top