सांगा सत्तेतला आमचा वाटा कुठ हाय रं... कवाडे असं का म्हणतायेत

Kawade demands that we join the government as promised by the Congress
Kawade demands that we join the government as promised by the Congress

अकोले (अहमदनगर) : विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर राहून निवडणूक लढलो. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून आम्हीही त्याचे घटक आहोत. निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हालाही सत्तेत सहभाग द्यावा. त्यासाठी काँग्रस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वचनपूर्ती करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

अकोले येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश सोनवणे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शशिकांत सोनवणे, प्रा. जयंत गायकवाड, सुनील गायकवाड उपस्थित होते.

प्रा. कवाडे म्हणाले, सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार चांगले काम करीत आहे. थोडीफार कुरबुरी सुरु राहतात. ते फार महत्वाचे नाही. मात्र भाजप याचा गैरफायदा घेऊन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो त्यांचा मूर्खपणा आहे. हे सरकार मजबूत असून ते आपला कार्यकाळ पूर्ण करीन. असा निर्वाळा त्यांनी दिला.

देशात व राज्यात सरकार बदलले. मात्र अनुसुचित जाती जमातीवर अत्याचार वाढत आहेत. असे असूनही अॅट्रोसीटी रद्द करण्याची मागणी वाढत आहे. पण अत्याचार होऊ नये याबाबत कोणी काही बोलत नाही. या गुन्ह्यावर देशात व राज्यात सरकारचा वचक राहिला नाही. ॲट्रोसीटीचे गुन्हे लवकर दाखल करून घेतले जात नाहीत. घेतल्यास क्रॉस केस नोंदविली जाते. यासाठी कठोर निर्णय घेऊन प्रतिबंध घातले पाहिजेत. ज्या जिल्ह्यात असे प्रकार होत असतील तेथील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना जबाबदार धरले पाहिजे.

त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे स्पष्ट करून राजगृह हल्ला निंदनीय आहे. त्याला जबाबदार असणाऱ्याऱ्यावर कारवाई करण्यात यावी. माथेफिरू नेमके बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हल्ले का करतात. आता पर्यंतचा इतिहास आहे की, हे हल्लेखोर अजून ही सापडत नाहीत.

आरपीआय संघटनामध्ये ऐक्य नाही याला कारण नेतृत्वामध्ये अहंकार आहे. एकमेकांवर नेतृत्व करण्यावरून कुरघोडी केली जात आहे. या ऐक्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहेत. निवडणूकीपुरते ऐक्य नसावे. तर सामाजिक ऐक्य असावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. असे निदर्शनास आणून देत प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीमध्ये आरपीआय सोडून सर्वाना सहभागी करून घेतले. त्यांनी पुढाकर घेतल्यास सर्व संघटनाचे ऐक्य होणे शक्य आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धेयधोरणानुसार आरपीआय पक्षात सर्वांनी एकत्र यावे, असे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शेवटी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com