गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना केदारेश्वर देणार नुकसान भरपाई, राज्यातील पहिलाच कारखाना

Kedareshwar will compensate the farmers
Kedareshwar will compensate the farmers

शेवगाव ः अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या केदारेश्‍वर साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी जाहीर केली आहे. अशा प्रकारची मदत जाहीर करणारा हा राज्यातील पहिलाच कारखाना असावा. 

विजेच्या कडकटासह व वादळी वाऱ्यासहकाल अवकाळी पावसाने तालुक्‍यातील पुर्वेकडील बोधेगाव, लाडजळगाव, गोळेगाव, आखेगाव, शेकटे कुर्द व बुद्रुक, सुकळी आदी परीसराला झोडपले. या परिसरात गहू, ऊस, हरभरा, मका, उन्हाळी पिके बाजरी, भुऊमुग, कांदा या पिकांसह पपई व इतर फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अॅड. प्रताप ढाकणे यांनी नुकसानग्रस्त भागाची नुकतीच पाहणी करुन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयांची तातडीने आर्थिक मदत जाहीर केली. तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांना या भागातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची ढाकणे यांनी विनंती केली. 

या वेळी केदारेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश घनवट, लाडजळगावचे काकासाहेब तहकीक, भाऊसाहेब क्षीरसागर, उपसरपंच दत्ता तहकीक, गहिनीनाथ ढाकणे, तात्यासाहेब मारकंडे, संजय आंधळे, रंगनाथ परदेशी, राजेंद्र मारकंडे, विक्रम ढाकणे आदी शेतकरी व तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी सहाय्यक सुभाष बारगजे, गजानन चव्हाण, कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे आदी उपस्थित होते. 

बोधेगाव व परिसरामध्ये पावसाळ्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अॅड. ढाकणे यांनी पाहणी केली. तसेच पाठपुरावा करुन शेतकऱ्यांनामदत मिळवून दिली होती. या भागात झालेल्या नुकसानाची त्वरीत पाहणी करुन कार्यक्षेत्रातील सभासद असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाप्रत्येकी चार हजार रुपयांची तातडीने आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com