केदारेश्वर इतरांप्रमाणेच उसाला भाव देईल, ढाकणेंची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संचालक तुषार वैद्य, त्यांच्या पत्नी छाया वैद्य यांच्या हस्ते झाले. गळीत हंगामाचा प्रारंभ लेखापरीक्षक किरण भंडारी यांच्या हस्ते झाला.

बोधेगाव : केदारेश्वर साखर कारखाना यंदाच्या हंगामात अन्य कारखान्यांच्या बरोबरीने भाव देईल. नोंदणी केलेल्या संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही.

यंदाच्या हंगामात 5 लाख मेट्रिक टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी केले. 

श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संचालक तुषार वैद्य, त्यांच्या पत्नी छाया वैद्य यांच्या हस्ते झाले. गळीत हंगामाचा प्रारंभ लेखापरीक्षक किरण भंडारी यांच्या हस्ते झाला.

ऍड. ढाकणे म्हणाले, ""यंदाच्या हंगामात अतिरिक्त उसाचे मोठे आव्हान आहे. सर्वांना मोठ्या जिद्दीने संघटितपणे या सगळ्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. सभासद, बिगरसभासद असा भेद न करता, सगळ्यांना एकसमान भाव देणार आहोत.

यंदा निसर्गाने साथ दिल्याने, तीन वर्षे पोषक वातावरण निर्माण झाले असून, उसाचे क्षेत्र वाढणार आहे. हे आव्हान सर्वांना एकत्रित पेलावे लागणार आहे.'' 
कामगारांना पुढील हंगामात नियमाप्रमाणे पगारवाढ करणार असल्याचे ऍड. ढाकणे यांनी जाहीर केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, सर्जेराव दहिफळे, किरण भंडारी, संचालक तुषार वैद्य यांची भाषणे झाली. प्रास्तविक तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी केले. उपाध्यक्ष प्रकाश घनवट यांनी आभार मानले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kedareshwar will give price to sugarcane like others