esakal | ऑनलाइन सेवेसाठी पाच वर्षापासून धडपडतोय ‘संत तुकाराम पुरस्कार’ प्राप्त खांडगेदरा गाव!
sakal

बोलून बातमी शोधा

Khandgedara village in Sangamner taluka mobile has not had a range for five years

पाच वर्षापूर्वी गावात मोबाईल सेवा सुरू झाली. या आनंदात असलेला संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा जेमतेम आठ दिवसानंतर विस्कळीत झालेली मोबाईल सेवा पूर्ववत करण्यासाठी आजपर्यंत धडपडत आहे.

ऑनलाइन सेवेसाठी पाच वर्षापासून धडपडतोय ‘संत तुकाराम पुरस्कार’ प्राप्त खांडगेदरा गाव!

sakal_logo
By
शांताराम जाधव

बोटा (अहमदनगर) : पाच वर्षापूर्वी गावात मोबाईल सेवा सुरू झाली. या आनंदात असलेला संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा जेमतेम आठ दिवसानंतर विस्कळीत झालेली मोबाईल सेवा पूर्ववत करण्यासाठी आजपर्यंत धडपडत आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचा संत तुकाराम पुरस्कार प्राप्त असलेले कौठे गाव अंतर्गत येणारा ४०० लोकवस्तीचा खांडगेदरा मात्र नेटवर्कसाठी पाच वर्षांपासून धडपडत आहे. गावात उपलब्ध असलेले मोबाईलवरून संपर्क साधताना साउंड ऑन करावा लागतो. परिणामी संभाषणातील गोपीनियता भंग पावते. इतकेच नव्हे तर अंत्यविधीचा निरोप पाहुण्यांना पोहचविण्यासाठी मोबाईल सेवेचे अनेक अडथळे पार करावे लागतात.

सध्या लॉकडाऊन व अपूर्ण ऑनलाईन कामांमुळे स्थानिकांसह शहरातून आलेले विद्यार्थी व ऑफीस कर्मचारी विस्कळीत मोबाईल रेंजमुळे अक्षरशः मेटाकुटीला आले आहे. त्यातच सर्वत्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस सुरू आहे. पण इथले विद्यार्थी मात्र दररोज सहा किलोमीटरचा प्रवास करून बाजूच्या गावांतील रेंजमध्ये जाऊन क्लास जॉईन करतात. 

दररोज गाडी व क्लास यामुळे पालकवर्ग सुध्दा हैराण आहे. काही पालकांनी नाईलाजाने घारगाव किंवा संगमनेर या ठिकाणी मुलांना भाड्याने खोल्या घेतलेल्या आहे. सलग पावसामुळे उद्धवस्त झालेला शेतीमाल आणि त्यातच ऑनलाईन शिक्षणाचा खर्च पालकांना झेपवणारा नाही. दुसरी गोष्ट सरकार जे धान्य पुरवते ते घेण्यासाठी थम्प द्यावा लागतो तो सुद्धा देण्यासाठी मशीनसह ग्राहकांना चार किलोमीटरवर रेंज उपलब्ध असलेल्या गावात यावे लागते.

पाच वर्षापूर्वी बीएसएनएलने वनकुटे येथे टॉवर सुरू करून मोबाईल सेवेबाबत इथल्या नागरिकांच्या आशा पल्लवीत केल्या. टेलिफोन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लोकांनी गावात येऊन जवळपास शंभर सिम कार्डसुद्धा विकली आणि एक दोन काड्या येणारी रेंज आठ दिवसांतच गायब झालीं. शिक्षणाचा पाया समजले जाणारे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षणही अपुऱ्या रेंजअभावी वंचित आहे. 

एकीकडे ‘डिजीटल इंडिया’साठी शासन कोटी रूपये खर्च करीत आहे. खांडगेदरा सारखी लोकवस्तीला मोबाईल सेवेचे दाखविलेले स्वप्न कधी पूर्ण होणार, असे जालिंदर ढोकरे, रोहीदास ढोकरे यांसारखे नागरिक लोकप्रतिनिधीनां दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर