
अहिल्यानगर : खेलो इंडिया बीच गेम स्पर्धेत अहिल्यानगरचा मल्लखांबपटू ओम घनश्याम सानप याने सांघिक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले आहे. भारत सरकारचा उपक्रम खेलो इंडिया बीच गेम नुकत्याच गुजरातमधील ब्ल्यू फ्लॅग बीच दिव दमन येथे पार पडल्या. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र मल्लखांब संघात ओमची निवड करण्यात आली होती. या स्पर्धा पुरलेला मल्लखांब, टांगता मल्लखांब, तसेच दोरीवरील मल्लखांब प्रकारात घेण्यात आल्या.