
महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली विजय साळुंके, तर शहराध्यक्षपदी वैशाली विजय आढाव यांची नियुक्ती करण्यात आली.
कोपरगाव (अहमदनगर) : भाजपची तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली विजय साळुंके, तर शहराध्यक्षपदी वैशाली विजय आढाव यांची नियुक्ती करण्यात आली. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून विक्रम पाचोरे आणि शहराध्यक्ष म्हणून अविनाश पाठक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. तालुका कार्यकारिणीमध्ये एकूण 73 जणांवर जबाबदारी दिली असून, यामध्ये दहा उपाध्यक्ष, 12 सचिव, 42 कोषाध्यक्ष, तर शहर कार्यकारिणीमध्ये 70 जणांचा समावेश करण्यात आला आहे.
याचबरोबर शहर व तालुक्यातील विविध आघाड्यांच्या अध्यक्षांनाही या वेळी निवडीचे पत्र देण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, सचिव कैलास खैरे, अनुसूचित जाती आघाडीचे विनोद राक्षे, कामगार आघाडीचे सतीश चव्हाण, बाळासाहेब पानगव्हाणे, वैभव आढाव, शिल्पा रोहमारे, योगिता होन आदी उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर