कोपरगावात पुन्हा नगराध्यक्ष वहाडणे टार्गेट, कोल्हेंचे टीकास्त्र

मनोज जोशी
Tuesday, 27 October 2020

मलिदा ज्यातून मिळेल, अशा विषयांना प्राधान्य दिले. पालिकेत आजअखेर 27पैकी 13 सभा झाल्या. त्यावरून नगराध्यक्ष शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास किती तत्पर आहेत, हे स्पष्ट होते.

कोपरगाव : ""नगरपालिकेची निवडणूक होऊन चार वर्षे झाली. शहरात केलेल्या कामाची "पावती' विधानसभा निवडणुकीत नगराध्यक्षांना कोपरगावकरांनी दिली. राज्यात सर्वाधिक मते मिळविणारे नगराध्यक्ष तीन वर्षांत 1300 मतांवर आले.

नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा होता,'' अशी टीका कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी केली. 

उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी आज पदभार स्वीकारला. त्या वेळी कोल्हे बोलत होते. पराग संधान, आप्पासाहेब दवंगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, आर. डी. सोनवणे, दिलीप दारुणकर, विनोद राक्षे, शहराध्यक्ष डी. आर. काले, अरुण येवले, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम आदी उपस्थित होते. 

कोल्हे म्हणाले, ""जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय सभेत घेण्यासाठी वारंवार मागणी करूनही नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. मलिदा ज्यातून मिळेल, अशा विषयांना प्राधान्य दिले. पालिकेत आजअखेर 27पैकी 13 सभा झाल्या. त्यावरून नगराध्यक्ष शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास किती तत्पर आहेत, हे स्पष्ट होते.'' 

शहराची 49 कोटी 50 लाखांची पाणीपुरवठा योजना सुरू करा, विस्थापित टपरीधारकांसाठी खोका शॉप उभारा, धर्मवीर संभाजी महाराज सर्कलजवळील रस्त्याची दुरुस्ती करा यांसह विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kopargaon, the mayor is again targeted