esakal | खोका शॉपचा विषय नगरपालिकेच्या कोर्टात; स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा नगररचना विभागाने दिला सल्ला

बोलून बातमी शोधा

In Kopargaon a meeting was held with Town Planning Department Assistant Director Akash Bagul regarding Khoka Shop}

शहरातील धारणगाव रस्ता, स्वामी समर्थ मंदिर, पूनम थिएटरसमोर अशा सात ते आठ ठिकाणी खोका शॉपसाठी शिष्टमंडळाने परवानगी देण्याची मागणी केली.

खोका शॉपचा विषय नगरपालिकेच्या कोर्टात; स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा नगररचना विभागाने दिला सल्ला
sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : खोका शॉपप्रश्‍नी नगररचना विभागाचे सहायक संचालक आकाश बागूल यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी त्यांनी पालिकेच्या स्वमालकीच्या जागेत किंवा मोकळ्या भूखंडावर, सर्वांच्या सहमतीने निर्णय घेऊन खोका शॉप उभारावेत, असा सल्ला देत, हा प्रश्‍न पुन्हा पालिकेच्या कोर्टात टोलवून बैठक आवरती घेतली. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर येणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
बागूल यांच्या दालनात बुधवारी (ता. 24) दुपारी दोन वाजता खोका शॉपप्रश्‍नी बैठक झाली. स्थानिक पातळीवर याबाबत निर्णय घ्यावेत, असे बागूल यांनी सांगितले. पालिकेकडे स्वतःच्या मालकीची केवळ बाजारतळ भागात जागा असून, त्यात केवळ 80 गाळे होऊ शकतात, हे यापूर्वीच नगराध्यक्ष वहाडणे व मुख्याधिकारी सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. आता पुन्हा सहायक संचालकांनी तेच सांगितल्याने, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहिला.
 
शहरातील धारणगाव रस्ता, स्वामी समर्थ मंदिर, पूनम थिएटरसमोर अशा सात ते आठ ठिकाणी खोका शॉपसाठी शिष्टमंडळाने परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. बैठकीत नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, भाजप गटनेते रवींद्र पाठक, राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके, नगरसेवक जनार्दन कदम, कैलास जाधव, संदीप वर्पे, मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, लक्ष्मण साबळे, प्रभाकर वाणी, विनायक गायकवाड यांच्यासह विस्थापित झालेले व्यापारी उपस्थित होते. 

कॉंग्रेस कार्यालयासमोर शॉप नकोत 

कॉंग्रेसच्या कार्यालयासमोरील जागेत कुठलेही शॉप किंवा व्यापारी संकुल बांधू नये. अन्यथा पालिकेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू, असे कॉंग्रेसचे लक्ष्मण साबळे यांनी बैठकीत स्पष्ट केले. 

खोका शॉपसाठी स्थानिक पातळीवर बैठक घेऊन चर्चा करू. सर्व समावेशक समितीची स्थापना करून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. 
- विजय वहाडणे, नगराध्यक्ष, कोपरगाव नगरपालिका.