Kopargaon News: नव्या युतीने कोपरगावच्या राजकारणावर परिणाम? थोरात - कोल्हे विरुद्ध विखे - काळे रंगणार सामना

उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी आणि कोपरगाव या तीनही महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांत नवी राजकीय समीकरणे आकार घेत आहेत.
Kopargaon News: नव्या युतीने कोपरगावच्या राजकारणावर परिणाम? थोरात - कोल्हे विरुद्ध विखे - काळे रंगणार सामना
esakal

Kopargaon Ahmednagar News: उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी आणि कोपरगाव या तीनही महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांत नवी राजकीय समीकरणे आकार घेत आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे मंगळवारी (ता.५) कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच संयुक्त दौरा करणार आहेत. काळेंचे वास्तव्य असलेल्या माहेगाव देशमुख येथे या दोघांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिर्डीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कोपरगावचे युवानेते विवेक कोल्हे यांच्या युतीला दिलेले हे उत्तर म्हणून विखे-काळे या नव्या युतीकडे पाहिले जाते. या युतीचा कोपरगावच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हा चर्चेचा विषय झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत कोपरगावातून आमदार आशुतोष काळे आणि त्यावेळच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत झाली. अवघ्या आठशे बावीस मतांच्या फरकाने काळेंनी ही निवडणूक जिंकली. त्यावेळी विखे पाटलांची साथ न मिळाल्याने हा पराभव झाला, अशी तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. आता परिस्थिती एवढी बदलली की भाजपचे कोल्हे आणि काँग्रेसचे थोरात यांनी एकत्र येऊन गणेश कारखान्यावर आपला झेंडा फडकवीला.(Latest Marathi News)

या निवडणुकीत काळेंनी कमालीचा संयम दाखवीत थेट सहभाग घेणे टाळले. एवढेच नाही, तर आपली मते शक्य होतील तेथे विखे पाटलांच्या पारड्यात टाकली. अर्थातच त्याचा त्यांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विखे पाटलांची जी काही मते आहेत ती मिळण्यात होणार यात शंका नव्हती. मात्र आता थेट या दोन्ही नेत्यांचे संयुक्त दौरे सुरू होणार असल्याने

Kopargaon News: नव्या युतीने कोपरगावच्या राजकारणावर परिणाम? थोरात - कोल्हे विरुद्ध विखे - काळे रंगणार सामना
Sakal Podcast : राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची ते इथूनच झालेली पराभवाची सुरूवात...

शिर्डी आणि संगमनेर पाठोपाठ कोपरगावच्या राजकारणात देखील घुसळण सुरू होणार आहे. कोल्हे-थोरात युतीमुळे विखे पाटलांना आता काळेंच्या सोबत आपली शक्ती उभी करण्यात कुठली अडचण राहीली नाही. योगायोग असा की काळे देखील महायुतीत आल्याने पक्षीय पातळीवरील अडचण देखील दूर झाली. त्याचा परिणाम म्हणून शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे पाटलांच्या विरोधात थोरात कोल्हे युती, तर कोपरगाव मतदारसंघात कोल्हेंच्या विरोधात काळे-विखे पाटील युती, असे नवे समीकरण आकारास आले. त्याचाच एक भाग म्हणून काळे यांनी पुढाकार घेऊन विखे यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या उद्घाटनांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

गोदावरी दूध संघाच्या सोलर प्लँटचा प्रारंभ

■ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार आशुतोष काळेंच्या यांच्या मंगळवारी होणाऱ्या संयुक्त दौ-याचे अत्यंत धोरणीपणे आयोजन केले आहे. विखे यांचे मेहुणे राजेश परजणे हे मागील निवडणुकीत उभे राहिल्याने आपला पराभव झाला, अशी कोल्हेंची तक्रार होती. परजणे यांच्या गोदावरी दूध संघाच्या सोलर प्लॅटचा प्रारंभ उद्याच्या दौऱ्यात होणार आहे.

एमआयडीसीवरून श्रेयवादाची लढाई

■ नियोजित शिर्डी एमआयडीसीसाठी विखे पाटलांनी पाचशे एकर जमीन उपलब्ध करून दिली. कोपरगाव आणि शिर्डीच्या सीमावर्ती भागात असलेल्या या एमआयडीसीचे शिल्पकार म्हणून विखे आणि काळेंच्या नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. तर कोल्हेंनी देखील आपण या प्रकल्पाचा पाठपुरावा केल्याने त्यास मंजुरी मिळाल्याचा दावा केला आहे. (Latest Marathi News)

Kopargaon News: नव्या युतीने कोपरगावच्या राजकारणावर परिणाम? थोरात - कोल्हे विरुद्ध विखे - काळे रंगणार सामना
Sakal Podcast : राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची ते इथूनच झालेली पराभवाची सुरूवात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com