बहिणींची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा

मनोज जोशी
Saturday, 21 November 2020

शहरातील अल्पवयीन मुलीसह तिच्या बहिणीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

कोपरगाव (अहमदनगर) : शहरातील अल्पवयीन मुलीसह तिच्या बहिणीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोद्या मंजूळ, सोन्या मंजूळ, गटर मंजूळ, विशाल गायकवाड (सर्व रा. दत्तनगर), अशी आरोपींची नावे आहेत. 

शहरातील अल्पवयीन मुलगी बहिणीसह 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बाहेर गेली असताना, आरोपींनी त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. एकीचा हात धरून ओढल्यामुळे घाबरलेल्या दोघी पळून गेल्या. आरोपींनी पाठलाग करीत दमदाटी केली. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या लोकांवर दगडफेक केली. त्यात दोघे जखमी झाले. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शहरातील दुसऱ्या घटनेतही एका मुलीचा विनयभंग करून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपी नकुल ठाकरे (रा. कोपरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kopargaon police has registered a case against four persons for molesting their sisters