विमा कंपनीची फसवणूक, वकिलासह दोघांवर गुन्हा

मनोज जोशी 
Saturday, 28 November 2020

बनावट दस्तऐवज तयार करून खोटा वाहन अपघात दाखवून न्यायालय व विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोपरगाव (अहमदनगर) : बनावट दस्तऐवज तयार करून खोटा वाहन अपघात दाखवून न्यायालय व विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंदकुमार छोटुलाल खिच्ची (रा. सावळीविहीर, ता. राहाता) व ऍड. मंगला राजेश कोठारी (रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी फिर्याद दिली. आरोपी खच्ची व ऍड. कोठारी यांनी राजेंद्र जयवंत वाघ व सुरेश जयवंत वाघ (रा.बेट, ता. कोपरगाव) यांच्या घरी जाऊन विम्याचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा दाखला घेऊन वकीलपत्रावर व इतर कागदपत्रांवर सह्या घेतल्या. नंतर वाहनाचा खोटा अपघात दाखवून बनावट दस्तऐवज तयार करून मोटार अपघात दावा दाखल केला. न्यायालयात दाखल केलेला दावा व पोलिस ठाण्याची फिर्याद, यातील मजकुरात तफावत आढळून आली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kopargaon police have registered a case against the two for defrauding the insurance company