
कोपरगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील डॉ. विवेक सूर्यवंशी यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाखांची रोकड चोरून नेली. घरातील कपाटातील सर्व सामानांची चोरट्यांनी उचकापाचक करून मुद्देमाल चोरून नेला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.