esakal | कोतवालीचे वाघ गेले आर्थिक गुन्हे शाखेत 

बोलून बातमी शोधा

maharashtra police

पोलिस दलासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांसाठी चर्चेत असलेले पोलिस निरीक्षक विकास वाघ यांची कोतवालीतून आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली. त्याचबरोबर अन्य दोन पोलिस अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या. तसा, आदेश पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी काढला.

कोतवालीचे वाघ गेले आर्थिक गुन्हे शाखेत 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : पोलिस दलासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांसाठी चर्चेत असलेले पोलिस निरीक्षक विकास वाघ यांची कोतवालीतून आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली. त्याचबरोबर अन्य दोन पोलिस अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या. तसा, आदेश पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी काढला. 

कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ वेगवेगळ्या कारणामुळे पोलिस दलामध्ये चर्चेत आले होते. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. दरम्यान, पोलिस दलाच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसंदर्भात अस्थापना मंडळाची काल पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

जनहित, कायदा व सुव्यवस्था व प्रशासकीय निकडीनुसार तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलिस निरीक्षक वसंत लक्ष्मण भोये यांची आर्थिक गुन्हे शाखा येथून शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात बदली झाली. शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रशासकीय कारणास्तव पोलिस निरीक्षक विकास वाघ यांची कोतवालीतून आर्थिक गुन्हे शाखेत बदली. पोलिस निरीक्षक प्रवीणचंद्र विश्‍वासराव लोखंडे यांची आर्थिक गुन्हे शाखा येथून कोतवाली पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली.