Farmers from Rashing demand a halt to high-voltage power line work along the Kukadi canal, citing pending land acquisition.
esakal
राशीन, : कुकडीच्या चिलवडी शाखा कालव्याच्या राशीन वितरिकेवरील लघुवितरिका २२ चे भूसंपादन होणे बाकी आहे. त्यातून महावितरणच्या ठेकेदाराकडून उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे, असा आरोप करत संबंधित शेतकऱ्यांनी काम थांबविण्याची मागणी केली आहे. यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना लेखी निवेदनाद्वारे साकडे घातले.