esakal | रोहित पवारांनी करून दाखवलं! जामखेडमधील कुसडगावची जागा एसआरपीएफसाठी वर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Kusadgaon site in Jamkhed allotted for SRPF

हे पोलिस प्रशिक्षण केंद्र पुन्हा कुसडगावलाच व्हावे याकरिता आमदार रोहित पवारांनी राज्याच्या मंत्रीमंडळात आपले वजन वापरले.सातत्याने सुरू होता

रोहित पवारांनी करून दाखवलं! जामखेडमधील कुसडगावची जागा एसआरपीएफसाठी वर्ग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामखेड : आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिले राज्य राखीव पोलिस गट क्रमांक-१९ केंद्र कुसडगाव (ता.जामखेड) येथे साकारणार आहे. याकरिता लागणाऱ्या जागेचे हस्तांतरण महसूल विभागाकडून राज्य राखीव पोलिस दलाकडे करण्यात आले. 

या जागेची पहाणी करण्यासाठी अप्पर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी कुसडगावला आल्या होत्या. त्यांच्यासमवेत अधिकाऱ्यांचा फौजफाटा होता.

राज्य राखीव पोलीस दलाचे कुसडगावला स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र होत आहे. एकूण अकराशे पोलिस  येथे राहणार आहेत. हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारल्याने तालुक्यात रोजगाराच्या वाटा उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पाकरिता लागणारी कुसडगाव येथील 130 एकर जागा राज्य राखीव पोलिस दलाकडे वर्ग करण्यात आली. अप्पर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी, पोलिस उपमहानिरिक्षक संजय बावीस्कर, समादेश श्रीकांत पाठक, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, चंद्रकांत मकर, सचिन अडाले, पोलिस उपनिरीक्षक सुनील ढोंबरे होते.

प्रशिक्षण केंद्राच्या कामाचा आराखडा तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या कामाचे टेंडर निघून काम सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जामखेड तालुक्याच्या शिरपेचात  कुसडगावमध्ये होणारे प्रशिक्षण केंद्र महत्वाचे असणार आहे. 

या प्रशिक्षण गट केंद्राला आहे इतिहास

राज्याच्या इतर भागात शिफ्ट झालेलं हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा नव्याने जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे  मंजूर करून घेतले. आमदार रोहित पवारांचा याकरिता पाठपुरावा सुरू होता.
आमदार रोहित पवार निवडून आल्यानंतर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले. या प्रशिक्षण केंद्रांमुळे जामखेड तालुक्याच्या वैभवात भर पडेल.

असे आले हे केंद्र

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे दोन वर्षांपूर्वी,राज्य राखीव पोलीस बल गट क्र,19  पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले होते मात्र, हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यात हलवण्यात आले होते. त्यामुळे जामखेडकरांना मिळालेली महत्वाकांक्षी योजना हातातून गेली होती. मात्र, हे पोलिस प्रशिक्षण केंद्र पुन्हा कुसडगावलाच व्हावे याकरिता आमदार रोहित पवारांनी राज्याच्या मंत्रीमंडळात आपले वजन वापरले.सातत्याने सुरू होता पाठपुरावा करुन राज्याच्या इतर भागात शिफ्ट झालेलं हे पोलीस प्रशिक्षण केंद्र याठिकाणी पुन्हा आणले. त्यामुळे  सेफ्टी आणि सिक्युरिटीचा चांगला फायदा होणार आहे. हे सेंटर नगरसाठी एकुलते एक आहे. त्यामुळे नगरला मोठी मदत होईल. सोलापूर, उस्मानाबाद, बीड या शेजारच्या जिल्ह्यांनाही या प्रशिक्षण केंद्राची मदत होणार आहे. संपादन - अशोक निंबाळकर

loading image