

-सतीश वैजापूरकर
शिर्डी : पोलिसांची सुस्त गस्त अन् तातडीच्या पोलिस मदतीसाठी ११२ क्रमांक डायल करण्याबाबत पुरेशी माहिती नसणे, हे दोन मुद्दे येथील दुहेरी हत्याकांडाच्या निमित्ताने ऐरणीवर आले. पोलिसांची नियमित गस्त आणि त्याद्वारे गुन्हेगारांना जरब बसविली असती, तर कदाचित हत्याकांड टळले असते. ११२ क्रमांक डायल करून पोलिसांची मदत मागितली असती आणि ती वेळेवर मिळाली असती, तर यातील किमान एक घटना, तरी टळली असती, असा दावा ग्रामस्थांतर्फे केला जात आहे. तातडीची पोलिस मदत हवी असेल, तर ११२ क्रमांक डायल करण्याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही, हा मुद्दा या निमित्ताने पुढे आला आहे.