हम मँपीग का काम कर रहे है... आज लष्करी अधिकारी पुन्हा वडगाव सावताळमध्ये

सनी सोनावळे 
Monday, 10 August 2020

दोन दिवसांपासून वडगाव सावताळ, वनकुटे, गाजदीपूर यासंह अन्य गावांमध्ये लष्काराचे अधिकारी जमिनीचे मोजमाप घेण्याचे काम करत आहेत.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : दोन दिवसांपासून वडगाव सावताळ, वनकुटे, गाजदीपूर यासंह अन्य गावांमध्ये लष्काराचे अधिकारी जमिनीचे मोजमाप घेण्याचे काम करत आहेत. नागरीकांना कोणत्याही प्रकाराचे माहीती पत्र न मिळाल्याने ते संभ्रमात आहेत. आजही लष्काराच्या गाड्या वडगाव सावताळमध्ये आल्यानंतर नागरीकांनी त्यांना घेराव घातला व याबाबत विचाराना केली.

याची एक चित्रफित 'सकाळ' हाती लागली असुन यामध्ये माजी सरपंच राजु रोकडे यांच्यासह ग्रामस्थांनी या अधिका-यांना घेराव घालुन याबाबत विचाराणा केली. असता यातील अधिकारी नागरीकांना हिंदी भाषेत उत्तर देत या क्या चल रहा है आप को पता नही क्या आपको नोटिफिकेशन आया नही क्या हम मॅपींग का काम कर रहै है हम आपना काम करने दो आसे उत्तर ग्रामस्थांना दिले आहे.

याबाबत माजी सरपंच राजु रोकडे 'सकाळ' शी बोलताना म्हणाले, आम्ही देशाचे हितच पाहत आहोत. मात्र आम्हाला याबद्दल कोणी काहीच माहीती देत नाही. सगळीकडे संभ्रम निर्माण झाला आहे. याबद्दल अधिकृत माहीती आम्हाला देण्यात यावी, अन्यथा आम्ही लष्कराच्या गाड्यांना अडवु, असा इशारा त्यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land survey by Army officials in Wadgaon Sawtal on Monday