esakal | लंके म्हणतात, आतापर्यंत कोणीच आणला नाही एवढा निधी आणला
sakal

बोलून बातमी शोधा

The largest fundraiser so far - Lanka

आमदार लंके यांच्या हस्ते आज ( ता. 22 )सुपे येथे सुपे वाघुंडे रस्त्याचे लोकार्पण , नविन वसाहतमधील दोन रस्त्यांचे काँक्रेटिकरण व्यायामा साहित्या प्रदान करणे तसेच हामॅक्स आदी सुमारे 80 लाख रूपयांच्या कामांचे उधघाटन प्रसंगी लंके बोलत होते.

लंके म्हणतात, आतापर्यंत कोणीच आणला नाही एवढा निधी आणला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः पारनेर तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंतच्या कोणत्याही लोक प्रतिनिधीने आपल्या कारकिर्दीत एवढा विकास निधी आनला नसेल इतका मोठ्या प्रमाणावर विकास निधी मी पहिल्या एक वर्षाच्या आत आनला आहे. सुपे गाव हे तालुक्याला दिशा देणार गाव आहे. येथील प्रेतक गोष्ट राज्याच्या कानाकोप-यात क्षणात पोहचते त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक निधी मी सुपे गावासाठी दिला आहे असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी विविध उदघाटण प्रसंगी केले.

आमदार लंके यांच्या हस्ते आज ( ता. 22 )सुपे येथे सुपे वाघुंडे रस्त्याचे लोकार्पण , नविन वसाहतमधील दोन रस्त्यांचे काँक्रेटिकरण व्यायामा साहित्या प्रदान करणे तसेच हामॅक्स आदी सुमारे 80 लाख रूपयांच्या कामांचे उधघाटन प्रसंगी लंके बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजी सरपंच राजू शेख होते. या वेळी अशोक सावंत, अॅड.राहुल झावरे, माजी सरपंच विजय पवार, सचिन पठारे, बाळासाहेब औचिते, अंकुश वाढवणे, सचिन काळे, अक्षय थोरात, किरण पवार, सचिन पवार, योगेश रोकडे आदी मान्यवर उपस्थीत होते.

लंके पुढे म्हणाले, मी तालुक्यात आमदार झाल्या नंतर केवळ नारळ फोडण्याचे काम केले नाही. प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. सध्या तालुक्यात 15 ते 25 ऑक्टोंबर या कालावधीत विकास पर्व या नांवाने एक अभियान सुरू केले आहे.

या काळात तालुक्यातील विविध गावांतील विकास कांमाचा थेट शुभारंभ करत आहे. तर काही कांमाचे लोकार्पण करत आहे. तालुक्यातील जनतेने पाच वर्ष राजकारण न करता केवळ निवडणुकीपुरते राजकारण करावे व किमान विकास कामांसाठी तरी जनतेने एकत्र यावे असे अवाहनही शेवटी लंके यांनी केले. स्वागत राजू शेख यांनी तर आभार शिवाजी पानमंद यांनी मानले. सुत्र संचलन सचिन काळे यांनी केले. 

loading image
go to top