

Lavhalwadi Ahilyanagar Travel Guide Discover Bhandardara Backwaters Green Hills Waterfalls And The Famous Honey Village
sakal
-नवनाथ खराडे
रोजच्या दगदगीपासून कुठे तरी दूर जायचं असेल, तर अकोल्यातील लव्हाळवाडीची वाट धरायची. चारही बाजूने सह्याद्रीच्या डोंगर रांगा, रस्त्याच्या दुतर्फा भंडारदराच्या फुगवट्याचे पाणी. त्यातून वाट काढत जायचं. जणू काही आपली कार पाण्यातून बोटीसारखी तरंगत चालल्याचा भास होतो. एकदम सिनेमातल्यासारखा फिल.